पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल या नव्यानेच स्थापन झालेल्या क्लबच्या अध्यक्षपदी प्रशांत देशपांडे यांची, तर सचिवपदी शलाका भालेराव यांची निवड करण्यात आली. रोटरी ३१३१ चे प्रांतपाल विवेक आरान्हा यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सदस्यांचा पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी जयंत राजपूत, प्रमोद सूर्यवंशी, दिपक चांडक, गिरिश देशपांडे, विशाल गुंजाळ, उदय कुलकर्णी, राजाभाऊ शिंदे, अमोल चाफेकर, कपिश जोशी, प्रीती सवाईराम आदी उपस्थित होते.